स्वातंत्र्याच्या ६६ वर्षापासून राज्यातील अनेक आदिवासी गावांना अजून
रस्तेही पहायला मिळत नाही. यामुळे सरकार नावाची गोष्ट दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या
आदिवासी गावापर्यत पोहचण्याचा प्रश्नच
उद्भवत नाही. राज्यातील अशाच शेकडो दुदैवी गावापैकी असलेले ब्रिटिश राजवटीपासून
हिल स्टेशन होण्यापासून वंचित राहिलेले माजी खाजदार श्री रामशेठ ठाकूर व आमदार श्री प्रशांत ठाकूर यांच्या पनवेल तालुक्यातील हे माची प्रबळ गाव.देशातील मुंबई, पुणे, ठाणे, नवीमुंबई,पनवेल,
रसायनी या सारख्या महत्वाच्या शहरांच्या आवघ्या काही किलो मीटर आंतरावर असलेले हे
गाव निसर्गाच्या आणि इतिहासाच्या कुशीत वसलेले गाव रस्ताविरहित आहे. गावात जायचे
झाले तर डोंगर चढून कडया-कपाऱ्यातून वाट काढत जावे लागतं. खरं तर रस्त्याचे काय
महत्व असते हे गावात गेल्याशिवाय इथल्या लोकांच्या वेदना ऐकल्या शिवाय कळत नाही.
असं म्हणतात की एक रस्ता विकासाच्या अनेक वाटा गावात घेऊन येत असतो. पण इथल्या
माणसांना विकासाच्या वाटांची स्वप्नच पडत नाहीत. त्यांना रस्ता हवाय तो रोजचं जगणं
सुकर करण्यासाठी.गावातील गरोदर स्त्रिाया आजारी माणसे, शाळकरी मुले, तसेच वयस्कर
माणसांना डोंगर उतरणे-चढणे शक्य होत नाही. परिणामी आजारी माणसांना वाहून नेण्यासाठी
त्यांना जूनही डोलीचा आधार घ्यावा लागतो. उच डोंगर माथ्यावरुन खाच–खळग्यातून किलो
मीटरची पायपिट करुन आलिवली प्राथमिक केंद्रात न्यावे लागते. त्यामुळे अनेकदा उपचार
अभावी त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागते. याचा परिणाम काही वर्षापुर्वी कै.नामी
गंधू वाघ या स्त्रीला सर्पदंश झाल्याने दुदैवी मरण आले .गावात चौथी पर्यत शाळा आहे.
त्यासाठी दोन शिक्षक होते. परंतु मागील वर्षापासून एकाच शिक्षकाची शाळेवर हजेरी
लागते. ते रोज पनवेल (नेरा) ते ठाकुरवाडी पर्यत गाडीवर येतात. पुढे माची प्रबळ
पर्यत चालत येतात. शिवाय पुढील शिक्षणासाठी गावातील मुलांना पायपिट करुन दुसऱ्या
गावी जावे लागते. दुसऱ्या गावात शाळेत जाण्या-जाण्याचे अंतर 8 ते 10 किलोमीटर
असल्याने शिक्षणाची वाट बंद पडलीय. जी अवस्था शिक्षणाची आहे तिच अवस्था आरोग्याची
आणि रोजगाराची आहे.
गावातील लोक व्यवसाय म्हणून भाजीपाला लावतात व वन विभागाच्या जमिनीवर नाचणी, वरई करतात. तसेच जंगलात करवंदे, तोरण, कुळीद, कडुकंद, चिकटी, रानकेळी अश्या अनेक रानभाज्या मोठया प्रमाणात उपलब्ध असून हा तो मोठया बाजारपेठेत रस्ता नसल्याने घेऊन जाता येत नाही. त्यामुळे होईल तेवढा भाजीपाला डोक्यावर घेऊन आजुबाजुच्या गावामध्ये फिरुन विकावा लागतो. शिवाय डोक्यार लाकडे घेऊन ती विकून त्या पैस्यावर उधर्निर्वह करावा लागतो. आदिवासी लोक हा व्यवसाय अनेक वर्षापर्यत अशाच पध्दतीने करत आले आहेत त्यामुळे त्यांच्या डोईवऱ्या संघर्षाच्या ओझ्याने जीवन अतिशय कठिण बनले आहे.

हा
किल्ला माची प्रबळ गावाच्या कडेलाच लागून आहे हा किल्ला शिवकालीन आहे. त्याच किल्यावर माथेरान
हिल स्टेशन म्हणून ब्रिटिश सरकारची योजना होती. परंतु पाण्या अभावी या किल्याचा
माथेरान म्हणून विकास झाला नाही. जर प्रबळगडावर विकासाच्या दुष्टीने नजर फिरवली.
तर माथेरान आणि प्रबळगड यामध्ये समानता दिसून येते.प्रबळगडावर शिवाय प्रबळगडावर एक
श्री.गणेश मंदिर अनेक बुरुज, पाण्याची टाके, विविध पॉईट आहेत. बोरीची सोड या पॉईट
वरुन तुम्हाला मुंबई, रसायनी, नवीमुंबई, पनवेल, गा्ढी नदी, कर्नाळा किल्ला याचे
दर्शन घडून येते. त्याच प्रमाणे धोकीचा पॉईटवरुन माथेरान सहज दिसते व कलांवतीन
पॉईट वरुन कलावंती, पेण किल्ला, चांदेरी, गाढीनदी याचे दर्शन घडते. शिवाय
काळाबुरुज पॉईटवरुन मोरबे धरणाचे जवळून दर्शन होते.
कलावंती दुर्ग-
कलावंती दुर्ग-
हा दुर्ग देखील माचीप्रबळ
गावाच्या कडेला लागून आहे. या दुर्गावर चढून जाण्यासाठी खडक कापून पायऱ्या बनवल्या
आहेत. कोण्या राज्याचे कलावंती राणीवर प्रेम होत. ती त्याला सोडून जावू नये म्हणून
त्याने कलावंती दुर्गाच्या माथ्यावर एक महल बांधला होता. याच माथ्यावर शिमग्याच्या
सणाला माचीप्रबळ गावातील आदिवासी नृत्य करतात. हया दर्गाचे रुप इतके सुंदर आहे की
या दुर्गाची पुर्वीकाळी सोडून गेलेल्या 33 जगामधील ठिकाणामध्ये नोंद झाली आहे.
त्यामुळे कलावंती दुर्गाचा 11 वा नंबर लागतो. परंतु अजूनदेखील याकडे राज्य सरकारचे
लक्ष वेधले जात नाही.
माची
प्रबळ गावालगत प्रबळगड आहे. कलावंतीन दुर्ग असा इतिहासकालीन ठेवा तर आहेच परंतु
माची प्रबळ गावाच आजुबाजुचा परिसर नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे. माचीप्रबळ
गावात पोचण्याअगोदर एका मोठया दगडावर जय हनुमान व श्री गणेशमृर्ती कोरलेली दिसून
येते. शिवाय गावाच्या उजव्या हाताला एक पुराणिक शिवमंदीर आहे. व रात्री कडयावरुन
मुंबई, पनवेल, रसायनी शहर विद्युत रोषणाईमुळे एखादया लग्न सराई प्रमाणे नटलेले
दिसते.
जर सरकारनं मनात आणलं तर या गावाचा कायापलट होऊ शकतो. या ठिकाणाचा समावेश माथेरान, महाबळेश्वर यासारख्या थंड हवेच्या ठिकाणामध्ये समावेश होऊ शकतो. एवढेच नव्हे तर तेथे एक उत्तम प्रकारचे आदिवासी पर्यटन ठिकाण म्हणून धिक महत्व या ठिकाणाला मिळू शकते. आज आदिवासीचे जगल, आदिवासीची संस्कृती आदिवासीच्या जगलातील रानमेवा यांची जर योग्यरित्या जपवणूक केली तर भविष्यात या ठिकाणाला नजिकच निर्माण होणारे मेगासिटीसारखे आंतरराष्ट्रीय उद्योग आणि पनवेल नजीकचे नवीन होणारे विमानतळ तसेच मुंबईृ, नवीमुंबई, ठाणे, पुणे, पनवेल या सारख्या मोठया शहरातून पर्यटकांचा ओढा मोठया प्रमाणात येऊ शकतो. यामुळे या ठिकाणला माथेरान आणि महाबळेश्वरसारख्या ठिकाणासारखा दुसरा पर्याय जगासमोर उभा राहील. शिवाय तेथील आदिवासी लोकांना मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊल हे नक्की. तसेच प्रबळगड हा माथेरान म्हणून निवड होऊन देखील पाण्याअभावी माथेरान येथे विकसित झाले नाही. त्यासाठी सध्या पाणी म्हणून पर्याय प्रबळगडाच्या मागच्या बाजूला मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे धरण हा पर्याय देखील सध्या उपलब्ध झाला आहे. जर विकासाच्या नजरेने पाहिले तर हया ठिकाणाचा विकास करणे अधिकच सोपे झाले आहे. पण त्यासाठी लागणारी मानसिकता सरकारकडे नाही. प्रत्येक निवडणूकीत स्थानिक नेत्याकडून निवडणूकीच्या तोडावर आश्वासनांची खैरात वाटली जाते. पण येथे अजुनही एका रस्त्याअभावी एक आदिवासी गाव व आदिवासी पर्यटन ठिकाण म्हणून विकासासाठी नजर लावून बसलेले दिसते. 2006 च्या हिवाळी अधिवेशनात या गावाच्या रस्त्याचा मार्ग सुकर झाला होता. परंतु सदर निधी बांधकाम विभागाकडे सोपवला होता. याचा तपशलि माहिती अधिकारात विचारली असता सदर निधीतून ठाकूरवाडी ते माची प्रबळ दरम्यान रस्ता तयार केला आहे. अशी माहिती मिळाली. परंतु प्रत्येक्षात पाहिले तर ते फक्त सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लेखी आहे. प्रत्यक्षात तेथे रस्ताच नाही. यामुळे यामध्ये नेमक काय तथ्य आहे. हे गावातील सर्वसामान्य आदिवासी लोकांना कळत नाही. काही ठिकाणी डोंगर फोडून रस्ता बनवायला लागेल त्यामुळे या गावाची कहाणी प्रतिनिधीक आहे. त्या आदिवासीच्या दुदैवी दशावताराला सरकारची उदासिनता जबाबदार आहे. एका रस्त्याने अडलेले आदिवासी गाव व विकासाच्या प्रत्यक्षात असलेले नविन आदिवासी पर्यटन ठिकाण एका रस्त्याने अडवलेल्या या गावाचा जगायचा मार्ग सरकार सुकर करणार का? हाच प्रश्न तेथील आदिवासीकडून विचारला जातोय.

निलेश (भाऊ) भुतांबरा
संस्थापक
(प्रबळगड संवर्धन आदिवासी
सामाजिक विकास संस्था)
ठिकाणाबद्दल
अधिक माहिती www.ngo.prabalgad.com